Wednesday, 31 December 2014

New Year celebration छोट्या Cancer Angels सोबत

   सगळीकडे new year चा मौसम होता . New year चा तसा माझा कधीच खास असा प्लान नसतो.  ह्या वेळी मनात होता कि बाप्पा ला hi म्हणून यावं पण कदाचित माझा भग्गु (बाप्पा)चा मनात काही वेगळा प्लान होता माझासाठी .

    २९ डिसेंबर २०१४ पप्पा अचानक म्हणाले "cancer पिडीत छोट्या मुलांना मी drawing शिकवायला जाणार आहे तुला येशील का?" मी खूप excited झाले. मला असं एकदा तरी त्या छोट्या मुलांना भेटायचं होतं आणि तसं ही नुकताच Christmas झाला होता आणि नवं वर्ष हि सुरु होणार होतं म्हंटल हा प्लान खूप मस्त आहे. गेले shopping  ला पप्पांबरोबर आणि घेतले सगळ्यांना gifts. मी पुढल्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागले.

    परळच्या भटनागर शाळेत एक छोटीशी Christmas आणि New Year ची party organize केली होती. आम्ही तिकडे पोहोचलो पोहोचताच मला लहान मुलांचा हसण्याचा आवाज येऊ लागला. सगळी मुलं तिथे pass the parcel खेळत होती. parcel हातात थांबल कि काही मुले खूप excite होत होती तर काही जण पुढे खेळात खेळता नाही येणार म्हणून  हिरमुसली. कोणी कविता म्हणून दाखवत होते तर कोणी dance करत होते. हि सगळी मुले ५-१२ ह्या वयोगटातली  होती.
        मी hall मध्ये बसले त्यांचा खेळ बघत,त्यातला एक मुलगा उठून आला हात पुढे करून "Hii  Didi". Handshake करून मी हि त्याचे नाव विचारले "ओमकार", तोही साधारण १० वर्षाचा असेल.  पण ह्या सगळ्या मुलांना पाहून एक क्षण हि असा वाटला नाही कि ह्यांना खरच काही आजार आहे. किती आनंद होता प्रत्येकाच्या  चेहेर्यावर.

       काही मुले mask लाउनच खेळत होती,त्यांची chemotherapy ची treatment चालू असेल कदाचित. माझ्या पप्पांना पाहिल्यावर त्यांची उत्सुकता अजून वाढली. त्या मुलांनी आधी पण एक session पप्पांबरोबर attend केला होतं.

        Games संपले आणी मग सगळ्यांना drawing sheets दिल्यावर सगळे त्या activity मध्ये रमले. कोणी घर काढत होते तर कोणी Christmas tree. प्रत्येक जण आप-आपली drawings घेऊन येत होते माझाकडे "दीदी मेरा drawing देखो ","दीदी मला घर काढायला  शिकाव". I did my best to be wowed with everything they drew on the  sheets , and to be  honest, I was wowed. When I was their age I never had to deal with anything like what they’re going through.

      त्यांना बघून मी inspire झाले. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद मिळतो आणि आपण life मध्ये किती छोट्या छोट्या गोष्टींच tension घेत असतो. ह्या छोट्याशा मुलांकडून शिकावं कसं  life जगायचं.They  are so young, so strong, so much will to live.
       सर्वात hardest part मी experience केला जेव्हा ईवलुशी ५ वर्षांची सृष्ठी धावत आली hall मध्ये . ह्या पिटुकल्या जीवाला तर कळत हि नसेल cancer काय असतं  आणि आयुष्य  काय असतं. तिने पण हळूच hii केलं मला आणि माझा मांडीवर बसली. That little Angle  didn’t have the physical signs of cancer, but she was fighting with it for her life.
       सगळ्यांचे drawings काढून झाल्यावर Cake कापला. तेव्हा पण काही मुले विचारत होती "दीदी आज किसका birthday है ?" त्यांना समजावलं कि cake आपण का कापतोय. हे असं New Year  ला पण cake cutting असतं हे ऐकून ते सगळे surprise तर झालेच पण खुश हि झाले.
At the end of the  day सगळ्या मुलांना आम्ही नेलेले gifts आणि chocolates दिले,gifts मिळाल्यावर जी smile जो आनंद त्यांचा चेहऱ्यावरचा होता तो अवरणनिय  आणि  mesmerizing होता. त्यातल्या एका चिमुरड्याने जिव्हाळ्याने "दीदी आपके लिये" म्हणत मला Cadbury दिलं. काय नातं माझं आणि त्या मुलाचं ? तरीही त्याने दिले ते chocolate मला.
       Atlast त्यांचा निरोप घेताना सगळी मुले "Bye दीदी,bye दीदी " करत त्यांनी माझी पावले जड केली. तिथून निघावसं वाटतच न्हवतं मला . अवघ्या ३ -४ तासात मला ह्या चिमुरड्यांचा खूप लळा लागला . परत अशी  संधी मिळाली जायची तर मी नक्कीच जाईन ह्या मुलांबरोबर time spend करायला पण … पण ह्यातली किती जन परत भेटू शकतील मला ???? फक्त Hopes ठेवायचे बस कि yea next  time पण आपण भेटणार ह्या सगळ्यांनाच आणि खूप मज्जा करणार सगळे.

       हा experience आणि हा new years eve आता पर्यंतचा माझा best new year eve होता . I know I didn’t cure the cancer in these kids. But I made them smile, it’s not much, but it’s all I could do. I just wanted to share my experiences and show how easy it is to brighten other peoples’ day. Each moment of happiness you give them can really make a difference.
खुशियाँ चाहिये अगर जिंदगी में.…
तो किसी की जिंदगी में रंग भरके देखो. 
छोट्या मुलांबरोबर टिपलेले काही  क्षण










1 comment:

  1. In this selfish world.... It takes a big heart & courage to be selfless and help others.... Reading this wonderful experience which you have shared is truly amazing.... God is been so kind to you.... he has balanced equally by giving good thoughts, good teaching & good presence of mind to every individual, but only few people like you have followed his path & have created miracles like this.... I firmly believe that you have been sheltered & nurtured in the family who is such a sport, having impeccable manners.... I am mesmerised & inspired by you, your father & everyone who has contributed to make these special ones smile & making them feel that you people are there to care.... I would be honoured & blessed if I could take at least 1% from all you wonderful people and could utilise the same wherever in need.... I pray to almighty that may he give you more strength to keep doing such fabulous responsibilities which you do so passionately... Thank u Noopur & team.... God bless you all.

    ReplyDelete