Friday, 15 April 2011


आयुष्यात खुप काही
सांगायचं असतं
पण जे सांगायचं असतं
तेच राहून जातं.
कधी शब्द रुस्तात...
तर  कधी हरवतात...
म्हणून काही थांबायच नसतं.
फुलांची चर्चा
खूपच होते तरी .....
काट्यांच पण
एकायचं असतं ....

Tuesday, 5 April 2011

ह्यात माझी काय चूक.......




होय  आहे  मी  खूपच  वेगळी ….
माझ  रहस्य  कोणालाच  कधी  कळल  नाही ..
जगते  मी  कोणत्या    विश्वात ….
कधी  कुणाला  समजलच  नाही …..
मला कोणी  कधी  समजून  घेतलच  नाही
ह्यात  माझी  काय  चूक.......

चुकतो  तर  प्रत्येक  जन  एकदा  आयुष्यात …
पण  मी  अनेकदा  चुकले …आणि   पुन्हा  पुन्हा  तीच  चूक  करत  राहिले …
कारण  त्या  चुकानीच  मिळवली  मी   एका  प्रेमाची  वागणूक ….
मला  कोणी   कधी  समजून  घेतलच  नाही
ह्यात  माझी  काय  चूक............

मी  तर  मन  गुनतवल  एका  दगडात ….
दगडातून  पण  पाणी  काढता  येत  इतका  विश्वास  होता  माझा  प्रेमात ….
पण  माझा  निखळ  प्रेम  जर  ठरल  फक्त  कुणाची  करमणूक ….
मला  कोणी   कधी  समजून  घेतलच  नाही
ह्यात  माझी  काय  चूक ….. 


Monday, 4 April 2011

मीच माझा प्रेमाची

मीच माझा प्रेमाची एक ज्योत पेटवित गेले
अंधार्या रात्रि प्रकाशाची वाट मी शोधित गेले
न कुणाची साथ होती न कुणाचा आधार होता
फक्त उद्याचा कस्तुरीचा सुगंध दरवळत होता
न कळे मज चालताना दुःख कैसे हे भरून गेल
अन कुणाचा मंद स्पर्श मज ते देऊन गेले
न कशाचा स्वार्थ का कशाची मी हवारी होते
फक्त त्याचा प्रेमाची एक ओंजळ  मी मागित होते
फक्त त्याचा प्रेमाची एक ओंजळ मी मागित होते......