गेले ते दिवस… राहिल्या फक्त आठवणी
कालचीच गोष्ट वाटते जेव्हा मी ह्या PHCET मध्ये प्रवेश केल… इतका
दूर college असूनही खूप जवळच वाटायला लग्लय… आणि ह्या शेवटचा Farewell चा
दिवशी अश्रू आवरत नाहीत…
Direct Second Year Admissionअसल्यामुळे … 1st Year नावच भयाण वर्ष पदरी
पडलं नाही. पहिल्याच दिवशी निर्भय भेटला College ला मनात आला चल कोण तरी
ओळखीचा माणूस भेटला ह्या नव्या कोर्या कॉलेजमधे . College उशीरा join केल
तरी जास्त काळ नाही लागला friends बनवायला . भीत भीत राहणारी Diploma ची
पोर अचानक सग्ल्यान मध्ये रमू लागली अजूनही आठवतंय दर्शन आणि रोहन बरोबर
झालेला माझ पहिला भांडण ते रडणं,ओरडणं. सुप्रिया ने मला शांत करण,प्रज्ञा
ने मला विरोध करणं. आणि मग मी आणि सुप्रिया ने ठरवणं कि आता कोंडून नाही
राहायचं …सगळ्या claas बरोबर एकत्र राहणं.आणि आम्ही दोघी स्वच्छंद मानाने
सग्ल्यान बरोबर रमू लागलो.त्यात मैत्री झाली सुशांत,साबरी आणि रेखाशी आणि
त्याच बरोबर अख्या class शी. अजून आठवतात ते दिवस ते एकत्र क्रिकेट खेळणं .
होळी ला njoy करणं आणि बराच काही .मी ज्या दिवशी volley -ball चा मतच ला
गेलेले सुशांत ,पल्लवी,Noddy ,प्रथम ह्या लोकां सोबत त्याच दिवशी दर्शन
ने मारलेला माझा एकमेव मैत्रिणी ला Propose.तिने हळुवार दिलेला होकार . ते
त्यांचा Break -Up अगदी typical College life अनुभवयला मिळाली . 1st Year
वाले ज्यांना KT होती त्यांचा result लागणं. KT न सुटल्याने हिरमुसून
गेलेले काही जन… त्यातलाच एक योगेश. मी सुशांत आणि सुप्रिया त्याला आधार
देणं.अगदी सगळ सगळ स्वच्छ आठवतंय. त्या नंतरच काही दिवसांनी आमचा
Result,… आम्हाला म्हणजे मला 3 KT लागणं…आयुष्यात जे कधी झालं नाही ते
होणं… TENSION !!!!!!!! Xam परत देऊन कशा बाशा २ KT सोडवणं. आणि मग सुट्टी
:-D
सर्वात जास्त लक्षात राहील ते म्हणे आमच 3rd Year .
3rd Year ची सुरुवातच एकदम दणक्यात झाली . वर्षाचा सुरुवातीलाच Collge
Bunk करून waterfall ला जाणं. आता आठवतंय ती आमची official yet not so
official Picnic "Water-Kingdom " ला कसली ती मजाअ कसली ती धमाल 45degree
- 90 degree चा slides. College मध्ये Industrial Visit (शीम्ला ,मानली
चंडीगड )ची announcement. सगळे excited. त्य्यात परत सुरु झालं technical
फेस्ट "BOLT ". ते झाल्यावर xam . सगळ्यांना उत्सुकता होती ती IV ची .IV
साठी shopping करणं . IV चा दिवस उजाडणं. ते बेकार Train मधलं
जेवण,ते रात्रंदिवस UNO खेळणं . सारखं गाणी म्हणून म्हणून ते पकून जाणं.
शिमला ला सुप्रियाच चक्कर येउन कोसळणं. कैलास च रात्री zalela...rather
केलेला joke,स्नेहल ma'am,shilpa ma'am आणि Sajid सरांबरोबर Enjoy केलेला
DJ . कुफरी ला जातानाचं HORSE-RIDE ,Para-Gliding,Sketing . KUFRI वरून
खाली येताना उशीर होणं. Snehal ma'am ने खूप ओरडणं , न जेवताच बस मध्ये
बसणं. मला वायीट वाटणं . मी रडणं . कदाचित मी रडले हे शिल्पा ma'am ने
स्नेहल ma'am ला सांगणं . Dinner चा वली Snehal ma'am ने स्वताहून मला
भरवणं . :-D
आणि मग आला तो IV चा शेवटचा दिवस. कुलकर्णी ,प्राजक्ता ,हर्षित ,अनिश
गाणं म्हणता म्हणता रडणं . मी कुलकर्णी ला चिडवणं कि मी सगळ्यांना सांगणार
की तू रडला . :-D शिल्पा ma'am ने बोलणं "नुपूर मुझे बोहोत प्यारी लागती
हे" आणि मिठी मारणं . आणि finally आम्ही मुंबई ला परत येणं.
IV वरून एक गोष्टं खूप प्रकर्शाने जाणवली की आमचा क्लास अजून UNITE
झाला . इतर वेळी group ने राहणार सगळे एकत्र राहायला लागले. NATIONAL FEST "PERIFEREIA" जो NATIONAL होऊ शकल नाही त्यातही सगळ्यांनी उत्साहाने मदत केली.
शेवटचं वर्ष उजाडण. मी ह्याशेवाटचा वर्षाचा तितकासा
भाग होऊ शकले नाही पण तरी अर्ध्याहून अधिक वर्ष मी माझा class बरोबर "The
very 1st batch of PHCET" बरोबर काढली. मी तरी हि सांगू शकत कि last एअर
कसं असेल… सगळे PROJECT आणि SEMINAR मध्ये दंग. EXAM ला DSIP मध्ये
KT लागल्याने "in tension".तरीही BE-Comps chi Unity कायम. फक्त students
नाही तर professors पण आम्हाला आमचा ह्या UNITY साठी कधीच विसरू शकणार
नाहीत हे आम्हाला आताच उमगलंय . प्रदीप सर म्हणालेच होते " BE-COMPS के
UNITY के वजेसे हर बार कॉम्प्स के बच्चे बच जाते है " .
आता उजाडला Farewell चा दिवस,थोडं नाराज आहे मन पण तरी
मी माझ्या लाडक्या class साठी तयार केलेला Video मला दाखवायचं होता.
म्हणूनच मी गेले . Video पाहताना कित्येक जणांचे डोळे पाणावले अस्तिल.
कित्येक जणांनी मला खूप appreciate हि केल. सुप्रिया अक्षु ,माणू
,निर्भय,प्रथम इवेन teachers ला ही खूप आवडला video . माझा मैत्री चे माझा
प्रेमाचे प्रतिक म्हणून मी तयार केलेला video सगळ्यांना भावला आणि माझा
मेहनती चे इथेच सार्थक झाले.
ह्या college नि मला भरपूर काही दिले… खूप काही शिकवले
,एकमेकांवर विश्वास,एकजूट होऊन काम करणे,मैत्री ,प्रेम आणि गुरूंमध्ये एक
मित्र ज्यांना मी आयुष्य भर माझा हृदयाचा मखमली पेटीत जपून ठेवेन.

