Wednesday, 31 December 2014

New Year celebration छोट्या Cancer Angels सोबत

   सगळीकडे new year चा मौसम होता . New year चा तसा माझा कधीच खास असा प्लान नसतो.  ह्या वेळी मनात होता कि बाप्पा ला hi म्हणून यावं पण कदाचित माझा भग्गु (बाप्पा)चा मनात काही वेगळा प्लान होता माझासाठी .

    २९ डिसेंबर २०१४ पप्पा अचानक म्हणाले "cancer पिडीत छोट्या मुलांना मी drawing शिकवायला जाणार आहे तुला येशील का?" मी खूप excited झाले. मला असं एकदा तरी त्या छोट्या मुलांना भेटायचं होतं आणि तसं ही नुकताच Christmas झाला होता आणि नवं वर्ष हि सुरु होणार होतं म्हंटल हा प्लान खूप मस्त आहे. गेले shopping  ला पप्पांबरोबर आणि घेतले सगळ्यांना gifts. मी पुढल्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागले.

    परळच्या भटनागर शाळेत एक छोटीशी Christmas आणि New Year ची party organize केली होती. आम्ही तिकडे पोहोचलो पोहोचताच मला लहान मुलांचा हसण्याचा आवाज येऊ लागला. सगळी मुलं तिथे pass the parcel खेळत होती. parcel हातात थांबल कि काही मुले खूप excite होत होती तर काही जण पुढे खेळात खेळता नाही येणार म्हणून  हिरमुसली. कोणी कविता म्हणून दाखवत होते तर कोणी dance करत होते. हि सगळी मुले ५-१२ ह्या वयोगटातली  होती.
        मी hall मध्ये बसले त्यांचा खेळ बघत,त्यातला एक मुलगा उठून आला हात पुढे करून "Hii  Didi". Handshake करून मी हि त्याचे नाव विचारले "ओमकार", तोही साधारण १० वर्षाचा असेल.  पण ह्या सगळ्या मुलांना पाहून एक क्षण हि असा वाटला नाही कि ह्यांना खरच काही आजार आहे. किती आनंद होता प्रत्येकाच्या  चेहेर्यावर.

       काही मुले mask लाउनच खेळत होती,त्यांची chemotherapy ची treatment चालू असेल कदाचित. माझ्या पप्पांना पाहिल्यावर त्यांची उत्सुकता अजून वाढली. त्या मुलांनी आधी पण एक session पप्पांबरोबर attend केला होतं.

        Games संपले आणी मग सगळ्यांना drawing sheets दिल्यावर सगळे त्या activity मध्ये रमले. कोणी घर काढत होते तर कोणी Christmas tree. प्रत्येक जण आप-आपली drawings घेऊन येत होते माझाकडे "दीदी मेरा drawing देखो ","दीदी मला घर काढायला  शिकाव". I did my best to be wowed with everything they drew on the  sheets , and to be  honest, I was wowed. When I was their age I never had to deal with anything like what they’re going through.

      त्यांना बघून मी inspire झाले. किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद मिळतो आणि आपण life मध्ये किती छोट्या छोट्या गोष्टींच tension घेत असतो. ह्या छोट्याशा मुलांकडून शिकावं कसं  life जगायचं.They  are so young, so strong, so much will to live.
       सर्वात hardest part मी experience केला जेव्हा ईवलुशी ५ वर्षांची सृष्ठी धावत आली hall मध्ये . ह्या पिटुकल्या जीवाला तर कळत हि नसेल cancer काय असतं  आणि आयुष्य  काय असतं. तिने पण हळूच hii केलं मला आणि माझा मांडीवर बसली. That little Angle  didn’t have the physical signs of cancer, but she was fighting with it for her life.
       सगळ्यांचे drawings काढून झाल्यावर Cake कापला. तेव्हा पण काही मुले विचारत होती "दीदी आज किसका birthday है ?" त्यांना समजावलं कि cake आपण का कापतोय. हे असं New Year  ला पण cake cutting असतं हे ऐकून ते सगळे surprise तर झालेच पण खुश हि झाले.
At the end of the  day सगळ्या मुलांना आम्ही नेलेले gifts आणि chocolates दिले,gifts मिळाल्यावर जी smile जो आनंद त्यांचा चेहऱ्यावरचा होता तो अवरणनिय  आणि  mesmerizing होता. त्यातल्या एका चिमुरड्याने जिव्हाळ्याने "दीदी आपके लिये" म्हणत मला Cadbury दिलं. काय नातं माझं आणि त्या मुलाचं ? तरीही त्याने दिले ते chocolate मला.
       Atlast त्यांचा निरोप घेताना सगळी मुले "Bye दीदी,bye दीदी " करत त्यांनी माझी पावले जड केली. तिथून निघावसं वाटतच न्हवतं मला . अवघ्या ३ -४ तासात मला ह्या चिमुरड्यांचा खूप लळा लागला . परत अशी  संधी मिळाली जायची तर मी नक्कीच जाईन ह्या मुलांबरोबर time spend करायला पण … पण ह्यातली किती जन परत भेटू शकतील मला ???? फक्त Hopes ठेवायचे बस कि yea next  time पण आपण भेटणार ह्या सगळ्यांनाच आणि खूप मज्जा करणार सगळे.

       हा experience आणि हा new years eve आता पर्यंतचा माझा best new year eve होता . I know I didn’t cure the cancer in these kids. But I made them smile, it’s not much, but it’s all I could do. I just wanted to share my experiences and show how easy it is to brighten other peoples’ day. Each moment of happiness you give them can really make a difference.
खुशियाँ चाहिये अगर जिंदगी में.…
तो किसी की जिंदगी में रंग भरके देखो. 
छोट्या मुलांबरोबर टिपलेले काही  क्षण










Saturday, 13 September 2014

गेले ते दिवस…  राहिल्या फक्त आठवणी
कालचीच गोष्ट वाटते जेव्हा मी ह्या PHCET मध्ये प्रवेश केल… इतका दूर  college असूनही खूप  जवळच वाटायला लग्लय… आणि ह्या शेवटचा Farewell चा दिवशी अश्रू आवरत नाहीत… 

Direct Second Year Admissionअसल्यामुळे … 1st Year नावच भयाण  वर्ष पदरी पडलं नाही. पहिल्याच दिवशी निर्भय भेटला College  ला मनात आला चल कोण तरी ओळखीचा माणूस भेटला ह्या नव्या कोर्या कॉलेजमधे . College उशीरा join केल तरी जास्त काळ  नाही लागला friends बनवायला . भीत भीत राहणारी Diploma ची पोर अचानक सग्ल्यान मध्ये रमू लागली अजूनही आठवतंय दर्शन आणि  रोहन बरोबर झालेला माझ पहिला भांडण ते रडणं,ओरडणं. सुप्रिया ने मला शांत करण,प्रज्ञा ने मला विरोध करणं. आणि मग मी आणि सुप्रिया ने ठरवणं कि आता कोंडून नाही राहायचं …सगळ्या  claas बरोबर एकत्र राहणं.आणि आम्ही दोघी स्वच्छंद  मानाने सग्ल्यान बरोबर रमू लागलो.त्यात मैत्री झाली सुशांत,साबरी आणि रेखाशी आणि त्याच बरोबर अख्या class शी. अजून आठवतात ते दिवस ते एकत्र क्रिकेट खेळणं . होळी ला njoy  करणं आणि बराच काही .मी ज्या दिवशी volley -ball  चा मतच ला गेलेले सुशांत ,पल्लवी,Noddy ,प्रथम ह्या लोकां सोबत त्याच दिवशी   दर्शन ने मारलेला माझा एकमेव मैत्रिणी ला Propose.तिने हळुवार दिलेला होकार . ते त्यांचा Break -Up अगदी typical College life अनुभवयला मिळाली .  1st Year वाले ज्यांना KT  होती त्यांचा result लागणं. KT न सुटल्याने हिरमुसून गेलेले काही जन… त्यातलाच एक योगेश. मी सुशांत आणि सुप्रिया त्याला आधार देणं.अगदी  सगळ सगळ स्वच्छ  आठवतंय. त्या नंतरच काही दिवसांनी आमचा Result,… आम्हाला म्हणजे मला 3 KT लागणं…आयुष्यात  जे कधी झालं नाही ते होणं… TENSION !!!!!!!!  Xam परत देऊन कशा बाशा २ KT सोडवणं. आणि मग सुट्टी  :-D 

सर्वात जास्त लक्षात राहील ते म्हणे आमच 3rd  Year .  3rd  Year ची सुरुवातच एकदम दणक्यात झाली . वर्षाचा सुरुवातीलाच Collge Bunk करून waterfall ला जाणं.  आता आठवतंय ती आमची official yet not so  official Picnic "Water-Kingdom " ला कसली ती मजाअ कसली ती धमाल 45degree - 90 degree चा slides. College मध्ये Industrial Visit (शीम्ला ,मानली चंडीगड )ची announcement. सगळे excited. त्य्यात परत सुरु झालं technical फेस्ट  "BOLT ". ते झाल्यावर xam . सगळ्यांना उत्सुकता होती ती IV ची .IV साठी shopping करणं .  IV चा दिवस उजाडणं. ते बेकार Train मधलं जेवण,ते रात्रंदिवस UNO खेळणं . सारखं गाणी म्हणून म्हणून ते पकून जाणं. शिमला ला सुप्रियाच चक्कर येउन कोसळणं. कैलास च रात्री zalela...rather केलेला joke,स्नेहल ma'am,shilpa ma'am आणि Sajid सरांबरोबर Enjoy  केलेला DJ . कुफरी ला जातानाचं HORSE-RIDE ,Para-Gliding,Sketing . KUFRI वरून खाली येताना उशीर होणं. Snehal ma'am ने खूप ओरडणं , न जेवताच बस मध्ये बसणं. मला वायीट वाटणं . मी रडणं . कदाचित मी रडले हे शिल्पा ma'am ने स्नेहल ma'am ला सांगणं . Dinner चा वली Snehal ma'am ने स्वताहून मला भरवणं . :-D 
आणि मग आला तो IV चा शेवटचा दिवस. कुलकर्णी ,प्राजक्ता ,हर्षित ,अनिश गाणं म्हणता म्हणता रडणं . मी कुलकर्णी ला चिडवणं कि मी सगळ्यांना सांगणार की  तू रडला . :-D शिल्पा ma'am ने बोलणं "नुपूर मुझे  बोहोत प्यारी लागती हे" आणि मिठी मारणं . आणि finally आम्ही मुंबई ला परत येणं. 
IV वरून एक गोष्टं खूप प्रकर्शाने जाणवली की आमचा क्लास अजून UNITE झाला . इतर वेळी group ने राहणार सगळे एकत्र राहायला लागले. NATIONAL FEST "PERIFEREIA" जो  NATIONAL होऊ शकल नाही त्यातही सगळ्यांनी उत्साहाने मदत केली. 

शेवटचं वर्ष उजाडण. मी ह्याशेवाटचा वर्षाचा तितकासा भाग होऊ शकले नाही पण तरी अर्ध्याहून  अधिक वर्ष मी माझा class बरोबर "The  very 1st batch of PHCET" बरोबर काढली. मी तरी हि सांगू शकत कि last एअर कसं असेल… सगळे PROJECT आणि SEMINAR मध्ये दंग. EXAM ला DSIP मध्ये KT  लागल्याने "in tension".तरीही  BE-Comps chi Unity कायम. फक्त students नाही तर professors पण आम्हाला आमचा ह्या UNITY साठी कधीच विसरू शकणार नाहीत हे आम्हाला आताच उमगलंय . प्रदीप सर म्हणालेच होते " BE-COMPS  के UNITY के वजेसे  हर बार कॉम्प्स के बच्चे बच जाते है " . 

आता उजाडला Farewell चा दिवस,थोडं नाराज आहे मन पण तरी मी माझ्या लाडक्या class साठी तयार केलेला Video मला दाखवायचं होता. म्हणूनच मी गेले . Video पाहताना कित्येक जणांचे डोळे पाणावले अस्तिल. कित्येक जणांनी मला खूप appreciate  हि केल. सुप्रिया अक्षु ,माणू ,निर्भय,प्रथम इवेन teachers ला ही खूप आवडला video . माझा मैत्री चे माझा प्रेमाचे प्रतिक म्हणून मी तयार केलेला video सगळ्यांना भावला आणि माझा मेहनती चे इथेच सार्थक झाले. 

ह्या college नि मला भरपूर काही दिले… खूप काही शिकवले ,एकमेकांवर विश्वास,एकजूट होऊन काम करणे,मैत्री ,प्रेम  आणि गुरूंमध्ये एक मित्र ज्यांना मी आयुष्य भर माझा हृदयाचा मखमली पेटीत जपून ठेवेन.